स्वेछागृही भावगीत
- Devendra Deo
- Sep 8
- 1 min read
झुकू झुकू झुकू झुकू प्रगतीची गाडी
स्वच्छ_तेची ही नवीन वारीX2
स्वच्छ_(सुंदर ना'शिक)_ बनवूया
स्वेच्छागृही_ची निवड करूया
बनवूया, आपला परिसर निरोगी बनवूया
करूया, स्वच्छतेची निवड करूयाX२
आई करते मेहनत भारी
ताई बनवते जेवण भारीX2
बायकोची मदत करूया
स्वेच्छागृहीची निवड करूया
टाकूया, ओला कचरा पिशवीत हिरव्या टाकूया
करूया, स्वच्छतेची निवड करूयाX२
घंटागाडीची वेळ फिक्स नाही
कामगारांची होते घाई
निसर्गात कचरा टाकणे टाळूया
स्वेच्छागृहीची निवड करूया
टाकूया, सुका कचरा पिशवीत काळ्या टाकूया
करूया, स्वच्छतेची निवड करूयाX२
मनपा ठेवते सगळ्यांची काळजी
स्वच्छता मित्रांची वाढते त्राही
प्रशासनाला मदत करूया
स्वेच्छागृहीची निवड करूया
करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया
बनवूया, आपला नवभारत बलशाली बनवूया
(करूया, स्वच्छतेची निवड करूया
करूया, स्वेच्छागृहीची निवड करूया)x२


Comments